सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था करातून (एलबीटी) आतापर्यंत महापालिकेला ४६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. परंतु, अद्यापही शहरातील बड्या २४ व्यापाºयांकडे मोठी थकबाकी आहे. या व्यापाºयांकडील वसुलीसाठी कर निर्धारणाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.
राज्य शासनाने जकात बंद करून २०११ मध्ये एलबीटीची आकारणी सुरू केली होती. व्यापाºयांच्या विरोधानंतर एलबीटी बंद झाली. परंतु, दरम्यानच्या काळात व्यापाºयांना एलबीटीची आकारणी करण्यात आली होती. शहरातील अनेक व्यापाºयांकडे अद्यापही एलबीटीची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना जाहीर केली होती.
या योजनेत अर्ज केलेल्या व्यापाºयांचे सर्व अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. आता सराफ, आॅटोमोबाइल्स, कारखानदार, कंत्राटदार अशा २४ जणांना रडारवर घेण्यात आले आहेत. या २४ व्यापाºयांना व्याजासह थकबाकी भरण्यास नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर अभय योजनेतील सर्व काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर अर्ज न केलेल्या व्यापाºयांची कर निर्धारण वसुली करण्यात येणार आहे.
कर्मचाºयांना टार्गेट दिले- अभय योजनेत अर्ज न केलेले सुमारे ४५०० व्यापारी आहेत. त्यातील ५३६ व्यापाºयांकडे एलबीटीची मोठी थकबाकी आहे. या व्यापाºयांची वार्षिक उलाढाल ५० लाखांपेक्षा अधिक आहे. अशा व्यापाºयांचे सीएंकडून कर निर्धारण करून घेतले जात आहे. या व्यापाºयांना नोटिसा देऊन वसुलीचे काम सुरू केले जाणार आहे. एलबीटी वसुली अधिकाºयांना नियमितपणे आपल्या कामांचा आढावा सादर करायला सांगितल्याचेही ढेंगळे यांनी सांगितले.