आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : कोणत्याही पदावर राहा, सर्वसामान्यांसाठी पदाच्या माध्यमातून काय करता येईल ते पाहा़ देश आपल्यासाठी काय करतोय यापेक्षा देशासाठी आपण काय करु शकतो ते पाहा़ हिमालयाच्या शिखरावर जरुर पोहोचा, परंतु मनातील विनम्रता विसरु नका़ जगाला वाचवायचे असेल तर २४ तीर्थंकारांचे विचार, परंपरा, संस्कृती तरुणाईमध्ये रुजवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी केले़ जैन कासार विकास प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी सायंकाळी शिवस्मारक सभागृहात पार पडला, याप्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक राजा माने होते़ यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कंदले आणि पुरस्कारमूर्ती उपस्थित होते़ प्रास्ताविक संजय कंदले यांनी केले़ यावेळी दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले़ डॉ़ भारुड यांनी प्रारंभी मनोगतातून हिमालयाच्या शिखरावर जरुर पोहोचा, परंतु मनातील विनम्रता विसरु नका, आपल्या समाजाकडे कोण कसं पाहतोय याचा विचार करा असे ते म्हणाले़ संपूर्ण जगात जैन समाजबांधवांची संख्या ही ७० लाखांवर आहे़ १२० क ोटींच्या या देशात केवळ ४४ लाख आहे़ तरीदेखील देशात सर्वाधिक कर भरणारा जैन समाज आहे़ स्वत:च्या आयुष्यातील संघर्ष सांगत त्यांनी मांसाहार, चहा-कॉफी आणि कांदा-लसूणही सोडल्याचे म्हणाले़ लोकमतचे संपादक राजा माने यांनी अध्यक्षीय मनोगतात डॉ़ भारुड यांच्यासारखे आयएएस अधिकारी ही देशाची संपत्ती आहे, ती सामाजिक संस्थांनी जपली पाहिजे म्हणाले़ सूत्रसंचालन जिवराज खोबरे यांनी केले तर हुकू मचंद हेसे यांनी आभार मानले़ यावेळी डॉ़ विलास हरपाळे, प्रतिष्ठानचे सचिव महावीर दुरुगकर, कांतीलाल नळे, विनायक टोणगे, बाबुराव तंगा, माणिक व्यवहारे, शाम पाटील, विलास कंदले, सुभाषचंद्र वनकुद्रे, डॉ़ मधुकर लोखंडे, प्रा़ सुनीता इंदापुरे-तंगा, सीमा विभुते, स्रेहलता नळे आदी उपस्थित होते़ ------------------------पुरस्कारमूर्तींचा गौरव़़़च् विनोदिनी विभुते (स्व़ कुसुमताई तंगा आदर्श माता पुरस्कार)च् मतिसागर भाऊराव पाटील (जैन कासार जीवनगौरव पुरस्कार)च् शशिकांत मोहरे, अनिल जमगे, अमोल जगधने (स्व़ मधुकर कंदले उद्योगरत्न पुरस्कार)
२४ तीर्थंकारांचे विचार, परंपरा, संस्कृती तरूणाईत रुजवा : राजेंद्र भारुड, जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:00 PM