शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

सर्व शिक्षा अभियानातंर्गत सोलापूरात पहिली ते आठवीसाठी लागणार २४़५३ लाख पाठ्यपुस्तके

By admin | Published: April 11, 2017 1:48 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : सारे शिकूया पुढे जाऊया असे म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी यंदाच्या वर्षी २४ लाख ५३ हजार ८८१ प्रति लागणार असून, तशी मागणी जि़प़ प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्याच्या बालभारतीकडे केली आहे़इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे बालक पुस्तकांपासून वंचित राहू नयेत आणि केवळ पुस्तकांअभावी शिक्षणात अडचणी येऊ नयेत, शाळेतील सर्व मुलांची १०० टक्के उपस्थिती टिकावी, गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मुलांना सर्वशिक्षा अभियानातून प्रतिवर्षी मोफत पुस्तके दिली जातात़ यावर्षी महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व अंशत: अनुदानित खासगी प्राथमिक, शासकीय शाळा, अनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळांना ही पुस्तके मोफत पुरविली जाणार आहेत़ बालभारती, पुणे येथून जिल्ह्यास तालुकास्तरापर्यंत क्रमिक पाठ्यपुस्तकांचा पुरवठा मे २०१७ पासून करण्यात येणार आहे़ तालुकास्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकाऱ्यांना तालुकास्तरावरुन केंद्र व शाळास्तरापर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांना देण्यात येणार आहेत़उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होणार असून, पात्र विद्यार्थ्यांना तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक नागरिक व पालकांच्या समक्ष ही पुस्तके समारंभपूर्वक दिली जाणार आहेत़ पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या पाल्यांसाठी पाठ्यपुस्तके खासगी वितरकांकडून खरेदी करु नयेत, असे आवाहन जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)माध्यमनिहाय मुलांची संख्याएकूण मुले-४५०७३३मराठी माध्यमातील मुले-२३२३२१९उर्दू माध्यमातील मुले-७३४६३कन्नड माध्यमातील मुले-५७१९९----------------------तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या आणि लागणारी पुस्तके अक्कलकोट-३९६७२ - २२२२५०बार्शी-४४९२४ - २४२७८४करमाळा-३०१९१ - १६३७३६माढा-३७४१३ -२०१०९९माळशिरस-५९७८७ -३२७१८५मंगळवेढा-२८७५८ - १५७५१८मोहोळ-३५७०८ - १९२१२८पंढरपूर-५४६७२ - २९६०५१सांगोला-४०६४१ - २२१८४४उ़सोलापूर-४२८०४ - २३३६०४द़सोलापूर-३६१६३ - १९५६७२एकूण-४५०७३३ - २४५३८८१----------------------जिल्ह्यासाठी एकूण २४ लाख ५३ हजार ८८१ पाठ्यपुस्तके लागणार असून, याबाबत पुण्याच्या बालभारती संचालकांकडे तालुकानिहाय आॅनलाईन मागणी करण्यात आली आहे़ शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्यात येतील़- एस़जी़ क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी (जि़प़प्राथ़)