सोलापूर : शासनाच्या आदेशावरून राबिण्यात आलेल्या महसूल सप्ताहामध्ये ५४ हजार १२५ जणांनी लाभ घेतला आहे. यामध्ये अडीच हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून संजय गांधी निराधार योजनेतही नवीन लाभार्थी झाले आहेत. महसूल विभागाच्या वतीने ११ तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात महसुल सप्ताहात वेगवेगळे उपक्रम राबवले.
नागरिकांची त्यामुळे विविध कामे मार्गी लागली. या अंतर्गत जिल्ह्यात ५४ हजार १२५ जणांना या सप्ताहाचा लाभ झाला. उपक्रमास नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात लाभला. वाढता प्रतिसाद लक्षात घेता ही मोहिम ३० ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. सात बारा दुरुस्तीची २४२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी तालुकास्तरावर ९ हजार ८३५ नागरिकांची उपस्थित होती. त्यापैकी ७९७ लाभार्थी होते. त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सात बारा उताऱ्यावरील नावात दुरुस्तीचे १५५ प्रकरण हाेते. त्यापैकी २४२ प्रकरणांचे दुरूस्ती आदेश देण्यात आले. युवा संवाद उपक्रमाच्या अंतर्गत ७४९७ प्रमाणपत्र वाटप विविध तालुक्यात करण्यात आले. ३२० महाविद्यालयात जिल्हा प्रशासन पोहचले आहे. यामध्ये १४ हजार ६५० जणांची उपस्थित होती. यापैकी ४३३७ जणांना लाभ मिळाला. नवीन मतदार नोंदणी अंतर्गत २ हजार ७६८ जणांनी नोंदणी केली असल्याचे तहसिलदार दत्ता मोहोळे यांनी दिली.
११ हजार ८५८ जणांना 'एक हात मदतीचा'‘एक हात मदतीचा’ या मोहिम अंतर्गत ११ हजार ८५८ जणांना लाभ मिळाला. शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनांमध्ये नवे लाभार्थी समाविष्ठ झाले. जनसंवाद अंतर्गत जमीनीच्या नोंदी ९९७ जणांचे प्रकरण निकाली काढले. माजी सैनिकांच्या ३२७ अर्जांची निर्गती करण्यात आली. ५२७ महसूल कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करण्यात आले. ४२२ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशी माहिती महसूल विभागाचे तहसिलदार मोहोळे यांनी दिली.