सोलापूर: मोहोळ, पंढरपुर, मंगळवेढा, कुर्डुवाडी, बार्शी शहर (जि. सोलापूर), तुळजापुर (जि. उस्मानाबाद), रांजन गांव, हडपसर, बारामती (जि. पुणे), अहमदनगर, वडगाव या बारा गावातून मोटार सायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. मात्र एकजणाचा अद्याप शोध सुरु असून अटक केलेल्या तिघांकडून १२ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या २६ मोटार सायकली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जप्त केल्या आहेत.भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील रेकॉर्डवरील आरोपींनी गाडी चोरीचा गुन्हा केला असल्याची बातमी पोलीसांना मिळाली. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोनि प्रकाश भुजबळ व पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी वैभव तुकाराम यलमार, रामचंद सूर्यकांत यलमार (दोघे रा.भंडीशेगाव, ता. पंढरपूर), नामदेव बबन चूनाडे (रा.अनिल नगर, पंढरपूर) यांना अटक केली आहे. आरोपींना विश्वासात घेऊन पोलीसांनी त्यांच्याकडे चोरीच्या मोटार सायकली बाबत कौशल्यपूर्ण चौकशी केली. यानंतर त्यांनी चौकशी अंती सदर त्यांने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील मोटार सायकली चोरी केल्याचे सांगुन त्याने मोटर सायकली काढुन दिल्याने त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आल्या असुन तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ७ मोटार सायकलची चेंसी व इंजिन नंबर खाडाखोड केल्याने ती माहीती मिळवणे व १ आरोपीस अटक करणे बाकी आहे.
ही कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि प्रभाकर भुजबळ, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ नागनाथ कदम, पोहेकॉ शरद कदम,पोना सुनील बनसोडे, पोहेकॉ बिपीनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, नवनाथ माने, सिरमा गोडसे, पोकॉ समाधान माने, शहाजी मंडले, बजरंग बिचुकले, पोकॉ निलेश कांबळे, पोकॉ योगेश नरळे (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली आहे. पुढील तपास पोहेकॉ नवनाथ माने हे करीत आहेत.