सध्या सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णाचे काय हाल होणार? हा प्रश्न समोर आला आहे. अगोदरच तुटपुंज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काम करीत असलेल्या आरोग्य यंत्रणेवर आता पुन्हा ताण पडणार आहे.
सोलापूर शहर वगळता जिल्ह्यात कोविड-१९ अंतर्गत २८ वैद्यकीय अधिकारी व २३६ इतर कर्मचारी असे एकूण २६४ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले होते. आतापर्यंत त्यांना तीन-तीन महिन्यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. यादरम्यान या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. कोरोना काळात आरोग्य विभागाला वाढत्या कामाचा त्रास या कर्मचाऱ्यांमुळेच कमी झाला होता. आता या कार्यमुक्त आदेशामळे आहे त्या आरोग्य अपुऱ्या आरोग्ययंत्रणेला फटका बसणार आहे. अजून कोरोना सुरू असतानाच अचानकपणे या सर्वांना कार्यमुक्त केल्याने त्यांचेही भविष्य धोक्यात आले आहे.
-----
वरिष्ठांच्या सूचनेनुसार संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यांचा वर्कलोड आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. त्यांना पुन्हा कंत्राटी पुनर्नियुक्ती देण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे. आम्ही याबाबत त्यांना कळविले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा त्यांच्याकडून विचार होऊ शकतो. तसा विचार झाल्यास आम्ही अनुभवी म्हणून त्यांचा विचार करू शकतो.
- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्य चिकित्सक तथा सचिव-कोविड पदभरती निवड समिती, सोलापूर.
----
आम्ही ऐन कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरापासून आमच्या परिवाराचा कोणताही विचार न करता कोविड सेंटरमध्ये अहोरात्र रुग्णांची सेवा केली आहे. इतर जिल्ह्याप्रमाणे आम्हालाही पुनर्नियुक्ती देण्यात यावी.
विद्याधर काटे, जिल्हाध्यक्ष, महामारी योद्धा संघर्ष समिती.
---
.......................