आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर, दि. ३० - राज्य शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसाठी जिल्ह्यात नऊ लाख चौतीस हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी २८ कोटी ४३ लाख ५०३ रोपे तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक संजय माळी यांनी आज येथे दिली.सोलापूर जिल्ह्यात विविध विभागांच्या वतीने नऊ लाख चौतीस हजार रोपांची लागवड करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध विभागांना रोप लागवडीचे उद्दीष्ट्य निश्चित करून दिले आहे. रोपांची लागवड करण्यासाठी खड्डे काढण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती माळी यांनी दिली.त्यांनी सांगितले की, एक ते सात जुलै २०१७ या कालावधीत वनमहोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या कालावधीत राज्यात सर्वत्र चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याला नऊ लाख चौतीस हजार रोप लागवडीचे उद्दीष्ट्य आहे. त्याहूनही आधिक वृक्ष लागवड होण्याची शक्यता लक्षात ठेवून २८ लाखाहून आधिकची रोपे तयाप ठेवण्यात आली आहेत. ही रोपे जिल्ह्यातील तीस ठिकाणी असणाऱ्या रोप वाटीकेत तयार ठेवण्यात आली आहेत.नागरिकांनी रोपांची लागव़ड करावी यासाठी रोपे आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून पाच जुलै पर्यंत रोपे उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक घराकरीता पाच तसेच संस्थाकरीता २५ रोपांचा पुरवठा केला जाईल. सोलापूर शहरात तीन ठिकाणी आणि बार्शी , पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
वृक्ष लागवड मोहिमेसाठी २८ लाखांवर रोप उपलब्ध, संजय माळी यांची माहिती
By admin | Published: June 30, 2017 6:43 PM