सोलापूर : देशातील पहिल्या रो-रो सर्व्हिस ट्रेनची नेलमंगला ते सोलापूर (बाळे) स्थानकादरम्यान सुरुवात झाली़ दरम्यान, १५ तासांचा प्रवास करून ही २८ ट्रक मालाने भरलेली ट्रेन बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास सोलापुरातील बाळे रेल्वे स्थानकावर दाखल झाली़ बंगळुरुहून प्रामुख्याने स्पेअर पार्ट, फार्मा, अगरबत्ती, परफ्यूम इंडस्ट्रीजसाठी लागणारा माल सोलापुरात आणला आहे.
दरम्यान, प्रवासी, मालवाहतूक, पार्सल गाडी, किसान रेलनंतर सोलापुरातील उद्योजक, शेतकरी, व्यापाºयांना दिलासादायक ठरणारी देशातील पहिली खासगी रो-रो ट्रेन सुरू झाली़ मंगळवारी दुपारी १़३० वाजता निघालेली ही ट्रेन २८ ट्रक माल घेऊन बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापुरात दाखल झाली.
३० टक्के होतोय फायदा...सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातून साधारण: २०० ते ४०० ट्रक भरून कांदा, डाळिंब, सोयाबीनसह अन्य माल बंगळुरुला जातो़ रो-रो ट्रेनमुळे ट्रकची झीज थांबेल, डिझेल वाचेल, टोलनाक्यावर जाणारी रक्कम वाचणार आहे़ या गाडीला दोन ठिकाणी पाच-पाच मिनिटाचा थांबा आहे़ अवघ्या १५ तासात ही ट्रेन बंगळुरुला पोहोचणार आहे़ ट्रकने ने-आण करण्यापेक्षा रो-रोने हा माल बंगळुरुला पोहोच केल्यास संबंधित शेतकरी व उद्योजकांची ३० टक्के आर्थिक बचत होणार असल्याची माहिती उदयशंकर पाटील यांनी सांगितली.
सोलापूरहून शुक्रवारी रवाना होणार ट्रेनबंगळुरुहून माल घेऊन आलेली रो रो ट्रेन ही सध्या सोलापुरातील बाळे रेल्वे स्थानकावर उभी करण्यात आली आहे़ शुक्रवार ७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास डाळिंब, कांदा, तूरदाळ आणि अन्य शेतीमालाने भरलेली ४८ ट्रकची रो रो ट्रेन बंगळुरुकडे रवाना होणार आहे़