शेतीपंपाचे बिल अनेक शेतकरी वेळेवर भरण्यास दुर्लक्ष करतात. यामुळे अगदी अल्पभूधारकांचेही बिल किमान लाखाच्या घरात आहे. शासनाकडून नेहमी कृषी क्षेत्राला सहानुभूती असते. यामुळे महावितरणकडून नेहमीच घरगुती, व्यापारी, उद्योगधंदे या क्षेत्राप्रमाणे शेतीसाठी कडक धोरण घेतले जात नाही. शेतकऱ्यांनी वेळीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.
सध्या अक्कलकोट तालुक्यातील एकूण शेतीपंपधारकांची संख्या २३ हजार ५३१ इतकी आहे. त्या सर्वांचे मिळून २८२ कोटी ६७ लाख वीजबिल थकीत आहे. यामधून किमान पन्नास टक्केपेक्षा अधिक रकमेची सूट मिळण्यासाठी शासनाने महावितरणकडून निर्लेखनाद्वारे ‘कृषीपंप वीजधोरण-२०२०’ योजना सुरू केली आहे. या माध्यमांतून एकूण बिलातून दंड, विलंब आकार, व्याज, यासह पन्नास टक्केपेक्षा अधिक रकमेची सूट मिळणार आहे. जास्तीतजास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
कोट :
अक्कलकोट तालुक्यात कृषीपंपाच्या क्षमतेपेक्षा अधिक वीजबिल रक्कम थकीत राहिलेली आहे. सध्या २८२ कोटी ६७ लाख इतकी रक्कम प्रलंबित आहे. त्यासाठी शासनाने कृषीपंप वीजधोरण योजना आणली आहे. या माध्यमातून प्रत्येक ग्राहकांना पन्नास टक्केपेक्षा अधिक रकमेची सूट मिळणार आहे. याचा शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे यांनी केले आहे.
----