बार्शीत सोमवारी ८३, मंगळवारी ७९, बुधवारी ११६, गुरुवारी ८० तर शुक्रवारी २९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सोमवारी १६०८, मंगळवारी १८९०, बुधवारी १६७२, गुरुवारी १६२० तर शुक्रवारी १८२७ अशा एकूण ८ हजार ६१७ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलमध्ये ४३१ जण उपचार घेत आहेत. यामध्ये ५४ रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. एकूण ५४० रुग्ण सक्रिय आहेत. यात कोविड केअर सेंटरमध्ये १८६, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १४५ तर हेल्थ केअर सेंटरमध्ये २४४ रुग्ण आहेत.
बार्शीत असलेल्या आठ कोविड हॉस्पिटलमध्ये मिळून आयसीयू बेड ९१, ऑक्सिजन बेड ११९, आयसोलेशन बेड ८७आहेत. यात सध्या आयसीयूमध्ये ११४, ऑक्सिजनचे १०० तर आयसोलेशनचे ७७ बेड फुल्ल झालेले आहेत. तिन्ही मिळून ४३ बेड उपलब्ध आहेत.शुक्रवारी रॅपिडमध्ये १६७ तर आरटीपीसीआरमध्ये १२७ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये शहरात १०० आणि ग्रामीणमध्ये १९४ रुग्ण आहेत.