करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभाव केंद्राद्वारे ८४९ शेतकºयांची १० हजार ४७२ क्विंटल तूर, मका, उडीद या शेतमालाची खरेदी करण्यात आलेली असून ३ क ोटी २१ लाख २० हजार ७३७ रुपये शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती व माजी आ.जयवंतराव जगताप यांनी दिली.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितीने १६८ शेतकºयांची ६ हजार १७० क्विंटल मका खरेदी करून त्यांना ८७ लाख ९२ हजार ९६२ रुपये दिलेले आहेत. ४६९ शेतकºयांचे २ हजार ३०८ क्विंटल उडीद खरेदी केले असून १ कोटी २४ लाख ६३ हजार २०० रुपये दिले आहेत.
तूर खरेदी ९ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ५ मार्चअखेर २१२ शेतकºयांची १ हजार ९९३ क्विंटल खरेदी करण्यात येऊन त्यांना १ कोटी ८ लाख ६४ हजार ७३७ रुपये देण्यात आलेले आहेत. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा शेतमालाची आॅनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलेली असून शेतकºयांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जगताप यांनी केले.
शासनाच्या सहकार व पणन विभागाच्या सूचनेनुसार तूर,उडीद,मूग शेतमाल तारण योजना राबविण्यात आलेली असून बाजार समितीकडे आता पर्यंत १२ शेतकºयांनी २५० क्विंटल माल तारण म्हणून ठेवला आहे़ त्यांना बँकेमार्फत २ लाख ६७ हजार ७५० रुपयांचे तारण कर्ज वाटप करण्यात आलेले आहे, असे बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी सांगितले.