सोलापूर : सोलापूर शहर ग्रामीण भागात गुरूवारी कोरोनाचे ३१ नवे रूग्ण आढळले. यात शहरातील २९ तर ग्रामीणमधील २ रूग्णांचा समावेश आहे. २८ रूग्णांवर घरातच उपचार सुरू आहेत तर एकावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बुधवारी १५६ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल गुरूवारी महापालिकेच्या आरोग्य विभागास प्राप्त झाला. त्यापैकी १४२ रूग्ण निगेटिव्ह तर १४ पॉझिटिव्ह आढळून आले. यातील पुरूष ५ तर महिलांची संख्या ९ इतकी आहे. शहरातील भावनाश्रषी, दाराशा, जिजामाता, मुद्रा सनसिटी, नई जिंदगी, रामवाडी, शेळगी भागातील रूग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या ३४ हजार ५८६, मृतांची संख्या १ हजार ५१७ तर रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्या रूग्णांची संख्या ३३ हजार ०४० इतकी आहे. महापालिकेने आरोग्य विभाग सज्ज ठेवला असून लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, खोकला, सर्दी, ताप रूग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.