पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य मुकणे हा तरुण बायपास रोड वरील दत्तनगर मध्ये येथे आपल्या कुटुंबासह राहण्यास असून त्याचे किराणा दुकान आहे. वडील संतोष मुकणे यांना किडनीचा आजार असल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेले होते. परंतु तिथे त्यांच्यावर उपचार न करताच कुर्डूवाडीत उपचार घेऊ म्हणून फिर्यादीचा मामा धनाजी जाधव हा त्यांना कुर्डूवाडीकडे घेऊन ११ एप्रिल रोजी येणार होता. त्यांना पुढील उपचारासाठी येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येणार होते. म्हणून दवाखान्यासाठी दुकानात ३२ हजार रुपये रोख रक्कम ठेवली होती.
फिर्यादीचे मामा त्याच्या वडिलांना दवाखान्यात ॲडमिट करून रात्री १२ च्या सुमारास घरी आले. त्यांना दुकानाचे शटर अर्धे उघडे दिसले. अर्धवट उघडलेले शटर खाली ओढून मित्रांना व शेजाऱ्यांना ओरडून गोळा केले. दुकानाच्या आत एक इसम लपलेला दिसला. लगेच पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. लपलेल्या त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव चंद्रकांत झुंबर काळे (रा. भांबुरे वस्ती) असे सांगितले व त्याचा साथीदार भीमराव रज्जाक काळे असल्याचीही माहिती दिली. त्यावरून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. किराणा दुकानातून त्यांंनी चोरलेले पैसे मात्र मिळाले नाहीत.