नुकत्याच झालेल्या खरीप नियोजन बैठकीत महावितरणकडून दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात ३१ मार्च २०२० अखेर सुरक्षा अनामत रक्कम भरून वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या ९ हजार १६१ आहे. ३१ मार्च २०२१ अखेर सुरक्षा अनामत रक्कम भरून वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या ९ हजार ९०९ आहे.
सन २०२०-२१ मध्ये ५ हजार १९९ कृषी पंपांना वीज जोडण्या दिल्या असून, ३१ मार्च २०२१ पर्यंत १३ हजार ५७१ कृषी पंपांच्या वीज जोडण्या प्रलंबित आहेत. सन २०२१-२२ मध्ये वीज जोडणीची अपेक्षित मागणी संख्या १० हजार २८० आहे. सुरक्षा अनामत रक्कम भरून वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेले १३ हजार ५७१ अर्ज व १० हजार २८० अपेक्षित मागणी संख्या अशा २३ हजार ८५१ कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणला सुमारे ३३३ कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
तालुकानिहाय प्रलंबित वीज जोडण्या
उत्तर सोलापूर ५४९, दक्षिण सोलापूर ९४९, अक्कलकोट १११६, मोहोळ ७०६, बार्शी २२०१, माढा २३६७, करमाळा १३८९, माळशिरस ११८८, मंगळवेढा १३४९, पंढरपूर ६४०, सांगोला ११०६, सोलापूर शहर ११ अशा १३ हजार ५७१ वीज जोडण्या प्रलंबित आहेत.
तालुकानिहाय निधीची आवश्यकता
उत्तर सोलापूर १३ कोटी ४८ लाख ७५, दक्षिण सोलापूर २२ कोटी ७५ लाख, अक्कलकोट २६ कोटी ६२ लाख, मोहोळ १९ कोटी ३१ लाख, बार्शी ५४ कोटी ७३ लाख, माढा ५८ कोटी ३५ लाख, करमाळा ३५ कोटी १५ लाख, माळशिरस २९ कोटी ११ लाख, मंगळवेढा ३१ कोटी ३६ लाख, पंढरपूर १४ कोटी ४० लाख, सांगोला २८ कोटी २ लाख, सोलापूर शहर २६ कोटी २५ लाख अशी एकूण ३३३ कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.