शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

कत्तलीसाठी नेणाऱ्या ३५ गायींना पोलिसांच्या मदतीनं जीवदान

By विलास जळकोटकर | Published: April 03, 2023 5:48 PM

कत्तलीसाठी वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनाचा पोलिसांच्या मदतीने पाठलाग करुन ३५ गायींची सुटका

सोलापूर :

कत्तलीसाठी वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनाचा पोलिसांच्या मदतीने पाठलाग करुन ३५ गायींची सुटका रविवारी रात्री करण्यात आली. कुर्डूवाडी येथे ही कारवाई करण्यात येऊन वाहन ताब्यात घेण्यात आले. पंढरपुरातही अशीच कारवाई करण्यात आली. विहिंप आणि बजरंग दलाच्या गोरक्षा विभागानं यासाठी मदत केली.

रविवारच्या रात्री विश्वहिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत प्रेमचंद परदेशी यांना गुप्त माहितीनुसार दोन ठिकाणी पुढाकार घेऊन  पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. त्यापैकी पहिल्या कारवाईत  एम एच १३ सी जे ०८९४ या वाहनातून गायींची तस्करी करीत असलेले वाहन कुर्डूवाडी येथे पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. त्यातील ३५ गोवंशाना कत्तलीपासून जीवनदान देण्यात आले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका येथील मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांच्या मदतीने कत्तलखान्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एक मिनी आयशर एम. एच. १३ क्यू ७३९३ हे वाहन गोमासाने गच्च भरलेल्या स्थितीत ताब्यात घेण्यात आले. १३ गायींना दाटीवाटीनं कोंबून वाहतूक

याच दिवशी  पंढरपूर येथे रात्री ११ वाजताच्या दरम्यान एक आयशर क्रमांक एम एच १३ आर २३६२ वाहनात १३ गायींना दाटीवाटीने कोंबून त्यांचे तोंड व चारही पाय दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत निदर्शनास आले. हे गोवंश कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना या वाहनास पकडण्यात आल्याचे विश्वहिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख गोरक्षक प्रशांत परदेशी यांनी दिली. पंढरपूर येथील कारवाई यशस्वी करण्याकरिता पुणे येथील गोरक्षक शिवशंकर स्वामी (मानद पशु कल्याण अधिकारी) विश्वहिंदू परिषद बजरंग दल जिल्हाप्रमुख गोरक्षा विभाग सोलापूरचे प्रशांत परदेशी, उपजिल्हाप्रमुख योगीराज जडगोणार, गोरक्षक प्रतीक भेगडे,पवनकुमार कोमटी, कृष्णा सातपुते, विनायक निकते, तानाजी अस्वले, राहुल लंगडेवाले, दादासाहेब ढेरे, सिद्राम चरकूपल्ली, अविनाश कैय्यावाले, अविनाश मदनावाले, सतीश सिरसिल्ला, विरू मंचाल यांनी सहकार्य केले.