पंढरपूर : पंढरपूर-सांगोला रोड वर वापरण्यात येणारे ३७ इलेक्ट्रिक पोलची चोरी मंगळवारी रात्री बेंदवस्ती सातवा मैल तेरा फाटा कासेगाव (ता. पंढरपूर) येथून झाली आहे. त्यामुळे वरून शर्मा कॉन्ट्रॅक्ट अँड सप्लायर्स या कंपनीचे ७ लाख ८४ हजार ५४८ रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर ते सांगोला रोड वरील इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करण्याचे काम आर के चव्हाण स्ट्रक्चर या कंपनीकडून मे वरून शर्मा कॉन्ट्रॅक्टर सप्लायरस कंपनीला मिळाले आहे. यामुळे १० ऑक्टोंबर रोजी कंपनी १५२ बाय १५२ सेमी रुंदीचे १३ मीटर लांबीचे ४८२ किलो ग्रॅम वजनाचे ३७ पोल सांगोला ते पंढरपूर जाणाऱ्या रोड वर कासेगाव शिवारातील पेट्रोल पंपा लगत मोकळ्या जागेत ठेवले होते. या पोलची देखभाल कंपनीचे कर्मचारी करत होते. ते सर्व पोल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री चोरून नेले आहे. याबाबतची तक्रार रवी घनशाम शर्मा यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत.