शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चार कोटी २५ लाख मदत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 2:53 PM

पिकांचे पंचनामे सुरू;  ३५९८ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

ठळक मुद्देपुरामुळे नदीकाठच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरू सात तालुक्यांतील ७६ हजार ७७४.९१ हेक्टर क्षेत्रापैकी १६ हजार ५८८. २0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसानग्रामीण भागातील पूरग्रस्तांना १0 तर शहरी भागातील पूरग्रस्तांना १५ हजार सानुग्रह अनुदान वाटप

सोलापूर : उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भीमा व नीरा नदीला आलेल्या पुरात नुकसान झालेल्या ३५९८ पूरग्रस्तांना चार कोटी २५ लाखांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी  दिली. 

शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्याप्रमाणे ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना १0 तर शहरी भागातील पूरग्रस्तांना १५ हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यासाठी विशेष निधी दिला होता. या निधीतून जिल्ह्यातील १0२ पूरबाधित गावांतील ३५९८ पूरग्रस्तांना रोख पाच हजार तर उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. पूरग्रस्तांमध्ये शहरी विभागात पंढरपूर शहरातील १२९९ लाभार्थ्यांचा समावेश आहे तर ४४ गावांतील २२९९ लाभार्थी ग्रामीण भागातील आहेत. पंढरपूर तालुक्यातील १५५१ व शहरातील १२९९ पूरग्रस्तांना तीन कोटी ४९ लाख ९५ हजार इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. इतर तालुक्यांतील बाधित गावे व पूरबाधितांना वाटप केलेली रक्कम पुढीलप्रमाणे आहे. दक्षिण सोलापूर: गावे: १६, बाधित: ११७, वाटप रक्कम: ११ लाख ७0 हजार, अक्कलकोट: ३, बाधित: ७, रक्कम: ७0000, मोहोळ: ४, बाधित: २७, रक्कम: २ लाख ७0 हजार, माढा: १, बाधित: १, रक्कम: १0 हजार, माळशिरस: २३, बाधित: ४५९, रक्कम: ४५ लाख ९0 हजार, मंगळवेढा: ११, बाधित: १३७, रक्कम: १३ लाख ७0 हजार. अनुदान वाटपाचे काम २३ आॅगस्ट रोजी शंभर टक्के पूर्ण झाले आहे. 

पिकांचे पंचनामे सुरू- पुरामुळे नदीकाठच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरू आहे. पुरामध्ये अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माढा, मंगळवेढा आणि माळशिरस या सात तालुक्यांतील ७६ हजार ७७४.९१ हेक्टर क्षेत्रापैकी १६ हजार ५८८. २0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका १८ हजार ५१७ शेतकºयांना बसला आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरfloodपूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयgovernment schemeसरकारी योजना