सांगोला तालुक्यातील घेरडी, जवळा, कडलास, सोनंद, हातीद, जुनोनी, कोळे, चोपडी, नाझरे, वाटंबरे, वाढेगाव, महूद, अशा मोठ्या ग्रामपंचायतींना घरपट्टी, पाणीपट्टीच्या रूपाने मोठा महसूल जमा होतो. दरम्यान, मालमत्ताधारक खातेदारांकडून घरपट्टी व पाणीपट्टीच्या जमा होणाऱ्या करातून गावात विकासकामांबरोबर पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्यसेवा, कर्मचारी पगार, स्वच्छता साफसफाईसह विविध विकासकामे अवलंबून असतात. यामुळे ग्रामपंचायतींकडून दरवर्षी मार्चअखेर घरपट्टी, पाणीपट्टीचे उद्दिष्ट घेऊन मालमत्ता कराची वसुली केली जाते.
आता ग्रामपंचायतींकडे ठरावीक
दाखले देण्याचाच अधिकार
ग्रामपंचायतींना पूर्वी विविध प्रकारच्या अनेक दाखल्यांतून मोठे उत्पन्न मिळत होते; परंतु फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतींकडे काही निवडक दाखले देण्याचेच अधिकार उरल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शासन निर्णय सध्या ग्रामपंचायतीला जन्म, मृत्यू, विवाह, घर जागेचा उतारा, दारिद्र्यरेषेचा दाखला, विधवा परितक्ता असल्याचा दाखला देण्याचा अधिकार राहिला आहे.