शहाजी फुरडे-पाटील
बार्शी: कोराना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्व आघाड्यावर प्रयत्न करीत आहे़ लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावरचं पोट असणाºया लोकांचे खाण्याचे वांदे झाले आहेत. गंभीर स्थिती ओळखून बार्शीतील विविध सामाजिक संस्था, संघटना पुढे सरसावल्या आहेत़ लॉकडाऊनची मुदत वाढल्यामुळे डबे मागणाºयांची संख्या वाढली आहे. त्यासाठी दररोज नवीन संस्था अन्नदानासाठी पुढे येऊ लागल्या आहेत़ तर या संस्थांसाठी मदत करण्यासाठी बार्शीकर नागरिक व दानशूरही पुढे सरवावले आहेत़ आज अखेर शहरातील या संस्थामार्फत ७ हजार ३०० डबे शहर आणि तालुक्यात दिले जात आहेत.
बार्शी शहर हे विस्ताराने मोठे असून शहरातील स्लम एरिया, पारधी कँम्प, विविध हॉस्पिटल्स मधील रुग्ण व त्यांचे नातेवाईक, बाहेरगावाहून आलेले स्थलांतरित, निराधार, भिक्षेकरु, तसेच ज्यांचे हातावर पोट आहे़ दररोज मजुरीने गेले तरच त्यांचे •भागते. अशा लोकांचे लॉकडाऊनमुळे खाण्याचे वांदे झाले होते़ त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाऊल उचलले आहे. यातील नाकोडा जैन सेवा मंडळ ६५०, मातृभूमी प्रतिष्ठान १४९७, •भगवंत अन्नछत्रालय ७८६ , महेश यादव मित्र परिवार १६० , वर्धमान जैन स्थानक कम्युनिटी किचन ( ग्रामीण •भागातील विविध गावात ) ९०० डबे, आसिफ तांबोळी मित्रपरिवार ३००, कर्तव्य जनसेवा फांऊडेशन (पीके आणी आऱ के़ मित्रमंडळ- १२०० डबे , इंदुमती आंधळकर अन्नछत्रालय १३०० या प्रमाणे डबे दिले जात आहेत़ यातील कांही जण दाळ व सांबर तर उर्वरित संस्था या चपाती, •भाजी, •भात व सोबतीला फळेही देत आहेत.
यामध्ये •भगवंत मंदिरातील राजा अंबऋषी अन्नछत्रालय व मातृभूमी प्रतिष्ठानचे स्वत:चे कायमस्वरुपी किचन आहे़ तर उर्वरीत संस्थांनी तात्पुरती किचन सुरु केली आहेत़ या संस्थाना मदत करण्यासाठी विविध संस्था, व्यापारी असो़ डॉक्टर्स, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी सढळ हाताने आर्थिक व धान्य स्वरुपात मदत करत आहेत़ त्यामुळे या अन्नदान करणाºयांचा ही हुरुप वाढला आहे.
आजी-माजी विद्यार्र्थ्यांचंही असं योगदान- लॉकडाऊनच्या काळात अन्नदानाच्या कामाला हातभार लावण्यासाठी शिक्षण पूर्ण झालेले व सध्या नोकरी, व्यवसाय करत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या काळातील दहावी-बारावी च्या व्हाटसअप ग्रूपवर मदतीचे आवाहन केले. काही ग्रुपने गहू, तांदूळ, तेलडबे असे साहित्य खरेदी करून अन्नदान करणाºया ग्रुपला दिले. काही बॅचच्या ग्रुप ने ५ ते २५ हजारापर्यंत देणग्या देण्यास सुरुवात केली आहे. विजय शिंदे यांनी अशाच आवाहनाला प्रतिसाद देत २१ हजार देणगी दिली आहे. सुलाखे हायस्कूलच्या १९९२ च्या दहावीच्या बॅचने ५० हजार मातृभूमी प्रतिष्ठानला देण्यासाठी जमा केल्याचे संतोष कोल्हे यांनी सांगितले.
बाजार समितीकडून धान्याचे तीन हजार कीट- तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ही ज्वारी, तांदुळ, साखर, तेल, तुरदाळ, हरभरा दाळ, साबण अशा नऊ किलो धान्याचे तीन हजार किट वाटप केले आहे़ तर सुनिल भराडिया यांनी त्यांच्या शेतातील दोनशे क्विंटल धान्य ही गोरबरीबांना वाटप केले आहे़
बार्शीत आम्ही आवाहन करण्याअगोदर पासून विविध संस्थांचे अन्नदान सुरुच आहे़ त्यामुळे आम्हाला बार्शी शहर व तालुक्याची चिंता नाही़ या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रतीचे जेवण दिले जात आहे़ बार्शीकरांच्या दातृत्वाला आमचा सलाम आहे़ - हेमंत निकम, प्रांताधिकारी बार्शी