बार्शी : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत बार्शी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. यासाठी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात ४० काेटींचे अनुदान प्राप्त झाले असून, ६७ गावांतील २७ हजार ९१५ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली.
ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात अतिवृष्टी झाली. दुसऱ्या टप्प्यात २८ हजार ४१७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यासाठी शासनाकडून ४० कोटी रुपयांचा नुकसानभरपाई निधी प्राप्त झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील गावे
बेलगाव : १० लाख ५ हजार , मांडेगाव : १९ लाख ८८ हजार , चारे : ७० लाख ६९ हजार , खडलगाव : १९ लाख ८६ ताडसौंदने : ३४ लाख ३० , धांमनगाव आ. : २४ लाख ५८ ,कापशी : २४ लाख ८३, सावरगाव : ६१ लाख १९, सरजापूर : ४० लाख ९७, उंबरगे : ५२ लाख १५, आळजापूर : ४० लाख १४ हजार ,बावी आ.: ५१ लाख १५ , कासारवाडी : १९ लाख ९६ ,पिंपळगाव पांगरी :२० लाख ५७, तांबेवाडी : ५६ लाख ६७, यावली : १ कोटी ५४ लाख २५ हजार , काटेगाव : ३१ लाख ७१, पांगरी : ८३ लाख २४, वांगरवाडी : ३९ लाख २१, खांडवी : ९४ लाख ६२, भानसळे : २१ लाख ,कव्हे : ५५ लाख, देवगाव : ५१ लाख , गोरमले : ९० लाख, बाभूळगाव : ५७ लाख ७४ , पांढरी : १८ लाख ५५, तावडी : ४२ लाख, ममदापूर :३७ लाख १८, नारी : १० लाख ५८, खामगाव ५३ लाख , पिंपळवाडी :१४ लाख ३४ , गताची वाडी : ९२ हजार, मानेगाव : ५७ हजार शेलगाव मा. : ३६ लाख ५८ , मिरझनपूर :३३ लाख ६७, घारी : ३७ लाख ६१, शेलगाव व्हळे : ४१ लाख ८६, आरणगाव :३९ लाख ५१, भोयरे : २७ लाख ४७, ढेम्बरेवाडी : १३ लाख ३८, नागोबाची वाडी : २४ लाख ३८, लक्ष्याची वाडी : ९३ हजार, वालवड : २० लाख ३७, उपळाई ठ. :१ कोटी ३६ लाख ६२ , पफळवाडी १० लाख ४५, चुंब : २१ लाख ४१, धोत्रे : ४३ लाख ९३,पुरी : ३७लाख २६, दहीटने : ५६ लाख ३१, राळेरास :७२ लाख ३६, उपळे दु. :१ कोटी २२ लाख ८८, सूर्डी : ८४ लाख ४६, मळेगाव :१ कोटी ८५ हजार, पाथरी : ३७ लाख २४, पानगाव : ९३ लाख, अलीपूर : ५ लाख ३०, निंबलक :३६ लाख ३४, नांदनी : ६२ लाख ८२ हजार, तर कुसलंब : ५६ लाख ५८ हजार, वानेवाडी : २५ लाख २१ हजार, इरले : ४५ लाख ८०, इरलेवाडी : ३४ लाख ७०, इंदापूर : ३२ लाख ४१, तडवळे : ७० लाख ११, शेंद्री : ५८ लाख ८३