सोलापूर : जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी नोकरांवर हल्ला, मारहाण, गंभीर दुखापत, अपघात आदी विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून घेण्यास विलंब करणाºया ३१ पोलीस कर्मचारी व ९ पोलीस अधिकाºयांवर वेतनवाढ रोखण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील तालुका व गावपातळीवर होणारे गुन्हे तत्काळ दाखल करून घेणे आवश्यक आहे. गुन्हे दाखल करण्यास विलंब लावल्याने संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाºयांना गुन्ह्याचे स्वरूप पाहून सक्त ताकीद देणे, वेतनवाढ रोखण्याची नोटीस देणे, विभागीय चौकशी करणे अशा स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
दररोज होणाºया गुन्ह्यांची माहिती घेऊन विलंबाने दाखल झालेल्या गुन्ह्यांचा अहवाल मागविला जातो. चौकशी समिती नेमून गुन्हा दाखल होण्यास विलंब का झाला? याची चौकशी केली जाते. फिर्याद देणाºया व्यक्तीस फोन करून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून पैशाची मागणी करण्यात आली का? दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे का? याची माहिती चौकशी समितीकडून केली जाते, असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेत जे पोलीस कर्मचारी व अधिकारी दोषी धरले जातात त्यांच्यावर या कारवाया करण्यात आल्या आहेत. तक्रारीची दखल न घेतल्याने बहुतांश लोक हे थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात येतात. थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सप्टेंबर २0१८ ते फेब्रुवारी २0१९ दरम्यानच्या गुन्ह्यांची दखल घेऊन ही कारवाई केली आहे. अपघाताचा गुन्हा असेल तर त्यात चालकाला अटक केली जात नाही. वाहन हे मशीन असून, तो अपघात नकळत झालेला असतो, अपघातामधील वाहन जप्त केले जाते. एखाद्या गुन्हेगाराने जाणिवपूर्वक अपघात घडवून इसमाला इजा केली असेल किंवा ठार मारले असेल तर वाहनाचा हत्यार म्हणून वापर केला असे समजले जाते. अशा गुन्ह्यात अटक करावी लागते. पुन्हा पुन्हा दाखल होणाºया गुन्ह्यांचे वेगळे रेकॉर्ड तयार केले आहे, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.
करमाळ्यात सर्वात जास्त उशिरा गुन्हे जिल्ह्यात एकूण पोलीस ठाण्यांचे सात विभाग करण्यात आले आहेत. करमाळा विभागात सप्टेंबर २0१८ ते फेब्रुवारी २0१९ दरम्यान एकूण १0२ गुन्हे हे उशिरा दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर विभागात-७५, अक्कलकोट विभागात ५२, बार्शी विभागात-७२, पंढरपूर विभागात-७३, मंगळवेढा विभागात-७४, अकलूज विभागात-५२ असे एकूण ५00 गुन्हे हे उशिरा दाखल झाले आहेत. सप्टेंबर २0१८ मध्ये उशिरा गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण १५४ इतके होते, ते कमी होऊन फेब्रुवारी २0१९ अखेर २७ वर आले आहे. भविष्यात हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणावयाचे आहे, असेही यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे हे उपस्थित होते.