नरखेड : झेडपी शाळेत राबविलेल्या मोहिमेत ४० ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस
देण्यात आली.
नरखेड -प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय नरखेड अंतर्गत आज जि.प. शाळा नरखेड येथे कोविशिल्ड लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
नरखेड जि.प. शाळेतील शिक्षक, ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण झाले. आरोग्याधिकारी डॉ. किरण बंडगर यांनी ज्येष्ठांना दुसरा डोस दिला.
नरखेड प्राथमिक आरोग्य केद्रा अंतर्गत देगाव (वा), वाळूज, एकुरके, बोपले, डिकसळ, मसले चौधरी, भोयरे, हिंगणी, भांबेवाडी, खुनेश्वर आदि १५ गावात एकूण १५३८ लोकांना ४५ वर्षावरील व्यक्तींना लस देण्यात आली. या शिबिरात १११६ जणांना पहिला डोस तर ४२२ जणांना दुसरा कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधिकारी - डॉ. किरण बंडगर, सरपंच - बाळासाहेब मोटे, आरोग्य अधिकारी उमेश मोरे, आरोग्य सेविका बी.आर. सुरवसे, ग्रामसेवक तात्यासाहेब नाईकनवरे, कल्याण इनामदार, विजयकुमार काळे, रमेश राऊत, उत्तम मोटे, अर्जुन मोटे, विश्वनाथ धावणे, प्रीती जाधव, वैष्णवी पाटेकर, गीतांजली यावलकर, वनिता गरड, रूपाली चवरे उपस्थित होते.