सोलापूर : दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणावर चांगला उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापराकडे शहरातील नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. ई-व्हेइकलची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सोलापूर शहरात तीन हजार ९५४ इलेक्ट्रिक व्हेइकल रस्त्यावर धावत असल्याची नोंदणी ‘आरटीओ’कडे झाली आहे. सरकार पर्यावरणपूरक म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देत आहे.
डिसेंबर २०२२ पर्यंत हरात केवळ २,१७० इलेक्ट्रिक वाहने धावत होती. आता मे २०२३ पर्यंत त्यांची संख्या चार हजारपर्यंत गेली आहे. ही वाहने पर्यावरणपूरक आहेतच; पण त्यांचा इंधन खर्चही कमी आहे. या वाहनांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्चही तुलनेने कमी आहे. त्यामुळे या वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत चालला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.सोलापुरात दुचाकींची नोंदणी सर्वाधिकनव्या वाहनांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे दुचाकींचे आहे. त्याशिवाय गेल्या वर्षभरात ई-दुचाकी खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. वर्षभरात ई-दुचाकी अधिक रस्त्यावर आल्या. तर पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल चारचाकी खरेदीचे प्रमाण निम्मे आहे.
शहरातील ई-वाहनेदुचाकी - ३२५४मोपेड - ५३४चारचाकी - ६८प्रवासी रिक्षा - २२मालवाहू रिक्षा -३६तीनचाकी - ०१मालवाहतूक वाहन - ०६