शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

एफआरपी न देणाºया राज्यातील ४२ साखर कारखान्यांना नोटिसा, सोलापूरच्या २२ साखर कारखान्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:56 AM

ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम (३)मधील तरतुदीनुसार कारखान्याकडे गाळपाला आलेल्या उसाचे १४ दिवसात एफ.आर.पी. नुसार पैसे शेतकºयांना देणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्दे१५ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहून आपले म्हणणे लेखी स्वरुपात द्यावे असे म्हटले आहेएकतर कारखाने यावर्षी वेळेवर ऊस तोडणी करीत नसल्याच्या तक्रारी आहेततोडणीसाठी पैसे मोजायचे व कारखाने उसाचे बिलही वेळेवर काढत नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत भरच पडत आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : यावर्षीच्या हंगामातील एफ.आर.पी.ची रक्कम न देणाºया पुणे विभागातील ४२ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्या असून १५ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नोटीस दिलेल्या ४२ कारखान्यांमध्ये सोलापूरच्या २२ कारखान्यांचा समावेश आहे.ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम (३)मधील तरतुदीनुसार कारखान्याकडे गाळपाला आलेल्या उसाचे १४ दिवसात एफ.आर.पी. नुसार पैसे शेतकºयांना देणे बंधनकारक आहे.असे असताना पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूरच्या ४२ साखर कारखान्यांनी शेतकºयांना एफ.आर.पी. नुसार पैसे दिले नाहीत. पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी साखर आयुक्तांना दिलेल्या अहवालानसुार साखर आयुक्तांनी या साखर कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. १५ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहून आपले म्हणणे लेखी स्वरुपात द्यावे असे म्हटले आहे.पुणे विभागातील जयवंत शुगर, ग्रीन पॉवर, स्वराज इंडिया, भीमा शंकर, श्री छत्रपती, घोडगंगा, कर्मयोगी इंदापूर, राजगड, संत तुकाराम, भीमा पाटस, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज, बारामती अ‍ॅग्रो, दौंड शुगर्स, व्यंकटेश कृपा, पराग अ‍ॅग्रो, आदिनाथ, भीमा टाकळी, चंद्रभागा, सिद्धेश्वर, संत दामाजी, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, श्री विठ्ठल सहकारी, मकाई, कूर्मदास, सासवड माळी शुगर, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, सिद्धनाथ तिºहे, सीताराम महाराज खर्डी, बबनराव शिंदे, शिवरत्न आलेगाव, मातोश्री लक्ष्मी शुगर, गोकुळ, युटोपियन, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ विहाळ, जकराया या कारखान्यांचा समावेश आहे.  -----------------शेतकºयांची आर्थिक कोंडी- एकतर कारखाने यावर्षी वेळेवर ऊस तोडणी करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. ऊस तोडणी करणारे अगोदरच पैशाची मागणी करु लागले आहेत. ऊस जोपासण्यासाठी खर्च करायचा, शिवाय तोडणीसाठी पैसे मोजायचे व कारखाने उसाचे बिलही वेळेवर काढत नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत भरच पडत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने