महिलांच्या हाती गावगाडा आलेली गावे
पंढरपूर तालुक्यातील सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत निघालेल्या गावांमध्ये देवडे, एकलासपूर, रांझणी, सरकोली, शेळवे, शेटफळ, सिद्धेवाडी, तरटगाव, उंबरे, जळोली, पेहे, सुगाव खुर्द, कौठाळी, देगाव, कासेगाव, खर्डी, आंबे, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, उजनी वसाहत, पिराची कुरोली, शंकरगाव- नळी, तुंगत, नेमतवाडी आदी २३ गावांचा समावेश आहे. तर ओबीसी महिला प्रवर्गातून जैनवाडी, केसकरवाडी, खेडभोसे, शेंडगेवाडी, गार्डी, करकंब, पुळूजवाडी, आजोती, पांढरेवाडी, तनाळी, टाकळी, गुरसाळे, सुपली आदी १२ गावांचा समावेश आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून आव्हे-तरटगाव, उंबरगाव, नेपतगाव, शिरढोण, शेवते, सुस्ते, कोंढारकी, तिसंगी, नारायण चिंचोली, अजनसोंड आदी १० गावांचा समावेश आहे. तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून रोपळे व शेगाव दुमाला या गावांचा समावेश आहे. तालुक्यात सर्वसाधारण महिला प्रवर्गातून २३, ओबीसी महिला १२, अनुसूचित जाती १० व अनुसूचित जमाती २ अशा तब्बल ४७ महिलांना गावांचा प्रत्यक्ष कारभार पाहण्याची संधी मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.