सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आढळलेल्या १४१७ कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांपैकी ७९८ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी १२८ जणांचा मृत्यू झाला असून, अद्याप ४९१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा अधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.
उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. प्राथमिक लक्षणे : २८८, सौम्य लक्षणे : ८८, लक्षणे कार्यान्वित : ८0 आणि काळजीची लक्षणे : ३५. पुढील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: सिव्हिल हॉस्पीटल : ३२ (अति दक्षता: ४), अश्विनी ग्रामीण :२0 (३), विमा हॉस्पीटल :१२, डॉ. कोटणीस रेल्वे हॉस्पीटल : ३0, यशोधरा : ५0 (९), अश्विनी शहर : ३३ (११), मार्कंडेय : ७८ (८), लोकमंगल : १३, सिटी: ४, सीएनएस : १६, सिंहगड कोव्हिड सेंटर : १३७, शासकीय तंत्रनिकेतन : ६0, बार्शी : ६. अशाप्रकारे उपचारास दाखल झालेल्या रुग्णांची संख्या आहे. निम्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
चाचणी, तपासणीची संख्या वाढविणारसध्या सिव्हिल हॉस्पीटलमधील कोरोणा चाचणी करणाºया मशीनची क्षमता दररोज २५0 इतकी आहे. सध्या दररोज ३00 चाचण्या केल्या जात आहेत. महापालिकेकडे एक मशीन असून, त्याची क्षमता २४ इतकी आहे. या मशीनच्या जोडीला आणखी एक मशीन जोडण्यात येत असून ही क्षमता १00 पर्यंत नेली जाईल.
या मशीनचे सध्या फक्त ४00 किट उपलब्ध आहेत. डाळींब संशोधन केंद्रातील मशीन ताब्यात घेण्यात आली आहे. या मशीनची क्षमता १00 असून, सोमवारी ही मशीन कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे चाचण्याची क्षमता पाचशे ते साडेपाचशेपर्यंत जाणार आहे. या अनुषंगाने संसर्गाच्या तपासण्या वाढविण्यात येणार आहेत.