देशांतर्गत शेतमालाच्या वाहतुकीला गती मिळावी, यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वेचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. आत्मनिर्भर अभियानातील ऑपरेशन ग्रीनअंतर्गत किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतमाल बुकिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र यात ठराविक शेतीमाल व फळांचा समावेश होता.
यांना मिळणार ५० टक्के अनुदान
किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, बोर, आंबा, केळी, पेरू, पपई, मोसंबी, संत्रा, लिंबू, अननस, सफरचंद, फणस, बदाम, आवळा, चवळी, कारली, वांगी, काकडी, गाजर, फुलकोबी, मिरची, बटाटा, टमाटा, कांदा, आले, भेंडी, वाटाणे, लसूण यांसह सर्वच शेतमाल व फळांच्या वाहतूक खर्चावर ५० टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री नरसिंग तोमर, सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी निवेदनाद्वारे केली होती.