सांगोला : जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल पवार यांनी स्वखर्चातून मेडशिंगी येथे ५० ऑक्सिजनयुक्त मोफत बेड कोविड सेंटरची उभारणी केली. याचे उद्घाटन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते झाला.
सांगोला व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी शहर व तालुक्यातील सेवाभावी संस्थांना कोरोना सेंटर उभारणीसाठी आवाहन केले होते. जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल पवार यांनी मेडशिंगी येथे अत्यंत कमी वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ५० ऑक्सिजनयुक्त बेडचे कोविड सेंटरची उभारणी केली आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सीमा दोडमनी, तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. या ठिकाणी रुग्णांना मोफत औषधे, सकाळचा नाश्ता, अंडी दुपारी संध्याकाळी जेवण, दूध, शुद्ध पाणी, गरम पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
यावेळी जि. प. सदस्य सचिन देशमुख, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, ग्रामपंचायत सदस्य कल्पना शिंगाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
---
फोटो : २० अतुल पवार
मेडशिंगीत अतुल पवार यांनी उभारलेल्या ५० ऑक्सिजनयुक्त बेडच्या कोविड सेंटरची पाहणी करताना प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस निरीक्षक सुहास जगताप उपस्थित होते.