शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी दिलेल्या रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यवहार, पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझरविरोधात वैराग येथे गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:22 PM

धान फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थेअंतर्गत बार्शी तालुक्यातील तडवळे, हत्तीज, गुळपोळी, साकत व वैराग येथे बचत गटांना केलेल्या कर्ज पुरवठा रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यहार झाल्याचे उघडकीस आले आहे. 

ठळक मुद्देबार्शी तालुक्यात धान फाऊंडेशन ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्था आहे धान फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली सन २०१४ ते २०१८ या काळात तडवळे , वैराग, हत्तीज , साकत, गुळपोळी येथील बचत गटाना संस्थेमार्फत बँकेच्या वतीने कर्ज पुरवठा केला होता़पाच महिला सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत.

आॅनलाइन लोकमत सोलापूरवैराग दि ८ : धान फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थेअंतर्गत बार्शी तालुक्यातील तडवळे, हत्तीज, गुळपोळी, साकत व वैराग येथे बचत गटांना केलेल्या कर्ज पुरवठा रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझर विरोधात गैरव्यवहार करून अन्यायाने विश्वासघात केल्याचा गुन्हा वैराग पोलीसात दाखल करण्यात आला आहे़  हा गैरव्यवहार सन २०१४ ते २०१६ या काळात झाल्याचा प्रकार झालेल्या लेखा परिक्षण उघडकीस आला आहे. बार्शी तालुक्यात धान फाऊंडेशन ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्था आहे. या संस्थेअंतर्गत कलंजियम समुदाय बँकींग कार्यक्रम अंतर्गत बचत गट स्थापन करणे, बचत गटांना कर्ज, विमा, उपजिविके संदर्भात वेगवेगळे प्रशिक्षण देणे, महिलांना सक्षम बनविणे ही प्रमुख उद्दीष्टे या संस्थेची आहेत. त्यानुसार धान फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली सन २०१४ ते २०१८ या काळात तडवळे , वैराग, हत्तीज , साकत, गुळपोळी येथील बचत गटाना संस्थेमार्फत बँकेच्या वतीने कर्ज पुरवठा केला होता़ सदर कर्ज पुरवठ्याची रक्कम बचत गटप्रमुख ( सुपरवायझर ) यांनी गोळा करून ती बँकेत जमा करण्यासाठी त्यांच्याकडे दिली असता ५२ लाख ६९ हजार इतकी रक्कम बँकेत न करता वैयक्तीक कारणासाठी वापरून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे.यात तडवळे येथील आशा संतोष ताटे यांनी ३० लाख ४६ हजार, हत्तीज येथील लक्ष्मी महादेव मंडलीक हिने १० लाख ६४ हजार रुपए, साकत येथील शुभांगी विद्याधर क्षीरसागर हिने पाच लाख रुपये, गुळपोळी येथील विमल बाबासो सावंत हिने ४ लाख ४५ हजार रुपये, तर वैराग येथील हेमा भगवान सुतार हिने २ लाख १४ हजार असा एकुण ५२ लाख ६९ हजार इतकी रकम बँकेत जमा न करता वैयक्तीक कारणासाठी वापरून गैरव्यवहार करून अन्यायाने विश्वासघात केल्याची फिर्याद जिल्हा प्रांतीय समन्वयक मनिषा आनंद वाघमारे (धान फाऊंडेशन ) यांनी वैराग पोलीसांत दिली़ याबाबत पाच महिला सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस