सांगोला : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मूक्त शाळा या उपक्रमांतर्गत सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३८९ शाळांपैकी ५३ शाळा तंबाखू मूक्त झाल्याने गौरवास पात्र ठरल्या आहेत.
भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून पारित केलेले तंबाखूमूक्त शाळेचे सुधारित नऊ निकष या शाळांनी पूर्ण केल्याचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह संपूर्ण जगात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत आहे. यात शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शहरी व ग्रामीण विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या आहरी जात असल्याचे विदारक चित्र आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखूमूक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
----
तालुक्यातील प्राथमिक शाळा तंबाखूमूक्त करण्यासाठी सलाम फाउंडेशनच्या वतीने प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन मार्गदर्शन केले होते. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी केंद्र प्रमुख आणि तंत्रज्ञान शिक्षकांची कार्यशाळा घेतली होती.
- प्रकाय यादव
- गटशिक्षणाधिकारी, सांगोला