आॅनलाइन लोकमत सोलापूरबेंबळे दि २१: उजनीच्या वरच्या १९ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने वरच्या १९ पैकी नऊ धरणातून ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे.वीस दिवसांपासून दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग कमी झाला. अशात धरणातून भीमा नदी, बोगदा, कालव्यातून पाणी सोडल्यामुळे ५0 टक्क्यांच्या पुढे गेलेले धरण ४२.१७ टक्केपर्यंत आले. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने उजनीत विसर्ग येत आहे. बोगद्यातून सोडण्यात येत असलेले पाणी रविवारी बंद करण्यात आले आहे. कालव्यातून सोडण्यात येत असलेले ३ हजार ३00 क्युसेक्सवरून कमी करीत २ हजार ६00 वर विसर्ग आणला आहे. सध्या उजनीत दौंड येथून केवळ १७ हजार ४0 क्युसेक्स विसर्ग येत असून, २४ ते ४८ तासात उजनीत विसर्ग येण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे धरणात बंडगार्डन व दौंड येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग येणार असून उजनीची पाणी पातळी वाढणार आहे. ----------------------सोडण्यात आलेला विसर्गच्डिंभे १८ हजार ५१८, कळमोडी ६२८, भामा आसखेड ६ हजार ८00, पवना २ हजार २0८, मुळशी ६ हजार १00, घोड ५ हजार ४0, चासकमान १२ हजार ८९६, आंध्रा ७२२, कासारसाई ३00, एकूण ५३ हजार २१२उजनी सध्यस्थितीच्एकूण पाणी पातळी ४९३.९५0 मीटर, एकूण पाणीसाठा २,४६४.७४ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ६७१.७३ दलघमी, टक्केवारी ४३.६३ टक्के, विसर्ग-दौंड १ हजार ७0४ क्युसेक्स, बंडगार्डन ४ हजार ८९८ क्युसेक्स
उजनी धरणात ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:54 PM