जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांना जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी आ. शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
-----
आठ गावांसाठी असा मिळाला निधी
यामध्ये माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथे विहीर, पाईपलाईन,उंच टाकी, वितरण व्यवस्था यासाठी ८४ लाख ९४ हजार ४०९ रुपये, शेडशिंगे येथे विहीर, पाईपलाईन, उंच टाकी, वितरण व्यवस्था यासाठी ८२ लाख ५४ हजार ७५५ रुपये, विठ्ठलवाडी येथे उंच टाकी, वाढीव वितरण व्यवस्था यासाठी २४ लाख ८९ हजार ७७८ रुपये, तसेच पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे विहीर, पाईपलाईन, उंच टाकी, वितरण व्यवस्था यासाठी ९१ लाख १४ हजार २८४ रुपये, तसेच माळशिरस तालुक्यासाठी खळवे येथे पाण्याची टाकी, पाईपलाईन, वितरण व्यवस्था यासाठी २० लाख ९४ रुपये, माळखांबी येथे पाण्याची टाकी, पाईपलाईन, वितरण व्यवस्था यासाठी २४ लाख ७७ हजार रुपये, नेवरे येथे पाण्याची टाकी, पाईपलाईन, वितरण व्यवस्था यासाठी २४ लाख ९७ हजार १४६ रुपये, उंबरे (वे) येथे पाण्याची टाकी, पाईपलाईन, वितरण व्यवस्था यासाठी १७ लाख ३१ हजार ७५० रुपये असा एकूण ३ कोटी ७० लाख ६० हजार एवढा निधी मंजूर झाला असल्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
----