शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी थकविले ८८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:56 AM

आरआरसीनुसार कारवाईस पात्र : नऊ कारखान्यांनी दिली २१ टक्के एफआरपीनुसार रक्कम

ठळक मुद्देपुणे विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम शेतकºयांना दिली नाही पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी ४५ लाख ९५ हजार २०० मेट्रिक टन ऊस गाळप ९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या २१ टक्के रक्कम शेतकºयांना दिली

सोलापूर : पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील गाळप सुरू केलेल्या ५५ साखर कारखान्यांकडे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्याचे ८८४ कोटी ९२ लाख रुपये एफआरपी (रास्त किफायतशीर दर) नुसार थकले आहेत. यापैकी ९ कारखान्यांनी एफआरपीनुसार २१ टक्के रक्कम दिली आहे. हे सर्व ५५ साखर कारखाने आरआरसी (महसुली वसुली दाखला) नुसार कारवाईस पात्र ठरले आहेत.

पुणे सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी विभागातील तीन जिल्ह्यातील ऊस गाळपाचा आढावा ५ डिसेंबर रोजी घेतला. साखर कारखान्याकडून एक ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील झालेले गाळप, पडलेला साखर उतारा, एफआरपीनुसार शेतकºयांची देय रक्कम, दिलेली रक्कम व द्यावयाची राहिलेली रक्कम याची माहिती घेतली. गाळप सुरू केलेल्या ५५ साखर कारखान्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील १२, पुणे जिल्ह्यातील १७ व सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

या माहितीनुसार एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी ४५ लाख ९५ हजार २०० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. यापैकी ९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या २१ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. ऊस गाळपाला आणल्यानंतर किमान १४ दिवसांत शेतकºयांची एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र पुणे विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम शेतकºयांना दिली नाही.सहसचांलक पुणे यासंदर्भात तयार केलेल्या पत्रात वरील माहिती दिली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड हे कारवाई संदर्भात निर्णय घेणार आहेत.

सहकार मंत्र्यांचे कारखाने बंदच..

  • - सुरू असलेल्या साखर कारखान्यांपैकी सिद्धेश्वर कुमठे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे लोकमंगल बीबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे हे कारखाने अद्यापही साखर आयुक्त कार्यालयाकडे बंद आहेत. मकाई व मातोश्री लक्ष्मी शुगर हे कारखाने नोव्हेंबरच्या दुसºया पंधरवड्यात सुरू झाले आहेत. 
  • - ५५ कारखान्यांनी एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीचे एफआरपीनुसार १११७ कोटी २१ लाख देणे असून, २३२ कोटी २९ लाख रुपये दिले तर ८८४ कोटी ९२ लाख रुपये थकबाकी आहे.
  • - पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम कारखान्याने १४ कोटी २७ लाख ६५ हजार रुपये. विघ्नहार कारखान्याने २८ कोटी रुपये दिले आहेत.
  • - सोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याने  एफआरपीच्या ८३ टक्के रक्कम दिली आहे. ‘पांडुरंग’ श्रीपूरने  एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम दिली आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याने   एफआरपीच्या ७७ टक्के रक्कम दिली आहे.
  • - विठ्ठलराव शिंदे कारखान्याने  ८३ टक्के एफआरपी दिली आहे. लोकनेते कारखान्याने  ८१ टक्के एफआरपी दिली आहे. सासवड माळीने  २८ टक्केच एफआरपी दिली. जय हिंद कारखान्याने  एफआरपीच्या २५ टक्के इतकीच रक्कम दिली आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPuneपुणे