याबाबत अधिक माहिती अशी की, रस्त्यावरून वाहतूक करताना स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी रस्ता दुरूस्तीची मागणी केली होती. आ. बबनराव शिंदे व आ. संजयमामा शिंदे यांनी शासनाकडे सदर रस्ता दुरुस्तीसाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे ही रस्त्याची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेली आहेत.
----
हे रस्ते होणार
यामध्ये केंद्र शासन ३४ कोटी व राज्य शासन २२ कोटी असा एकूण ५६ कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी मिळणार आहे. यामध्ये माढा मतदारसंघातील माढा ते विठ्ठलवाडी रस्ता - ६ कि. मी. ५ कोटी ८५ लाख, मोडनिंब - तुळशी - हनुमंतवाडी - वरवडे रस्ता १० कि. मी. ९ कोटी २४ लाख, लऊळ ते शिराळ (मा.) रस्ता ५ कि. मी ४ कोटी ५० लाख रुपये, चोभेपिंपरी ते रोपळे (क.) रस्ता ७.५० किमी. ७ कोटी १५ लाख रुपये असा एकूण २७ कोटी रुपयांचा निधी माढा तालुक्यासाठी मिळाला आहे. तसेच करकंब - भोसे - व्होळे रस्ता ११ कि. मी. ७ कोटी ८० लाख, करकंब ते घोटी रस्ता ४.२० किमी ३ कोटी असा एकूण ११ कोटी इतका निधी पंढरपूर तालुक्यासाठी मिळाला आहे. तसेच माळखांबी ते जांभूड रस्ता ३.३० कि. मी. २ कोटी ७३ लाख, वेळापूर ते महाळुंग रस्ता ७.५० कि. मी. ६ कोटी ३० लाख, श्रीपूर चौकी ते खंडाळी रस्ता ३.५० कि. मी. २ कोटी ७३ लाख, श्रीपूर डी १९ ते माळेवाडी (बोरगाव) वेळापूर रस्ता ७ किमी ५ कोटी ३५ लाख असा एकूण १७ कोटी १० लाख इतका निधी माळशिरस तालुक्याला मिळाला आहे. माढा मतदारसंघासाठी एकूण ६० कि. मी. रस्ता मंजूर झालेला असून, ५६ कोटी एवढा निधी मंजूर झाला असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
-----