शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

छावण्यांसाठी झाले २०० कोटी खर्च, पण पशुधन वाचले ७०० कोटींचे : राजेंद्र भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:18 PM

सोलापूर जिल्हा; सुरुवातीपासून नियोजन केल्याने चारा खर्चात नाही गडबड

ठळक मुद्देचारा आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्यावर एप्रिलमध्ये चारा छावण्या सुरू केल्या सात महिने जिल्ह्यातील छावण्यांमध्ये एक लाखाच्यावर पशुधन होतेनवरात्रीनंतर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील चारा छावण्या आपोआप बंद झाल्या

सोलापूर : जिल्ह्यात एप्रिलपासून सात महिने चाललेल्या चारा छावण्यांसाठी २०० कोटींचा खर्च आला असला तरी दुष्काळात ७०० कोटींचे पशुधन वाचविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

जिल्ह्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी खरीप वाया गेला. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. दुष्काळाचे चटके जाणवू लागल्यावर फेब्रुवारीपासूनच टंचाईचे नियोजन सुरू करण्यात आले. चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्यावर एप्रिलमध्ये चारा छावण्या सुरू केल्या. छावण्या सुरू करण्याआधी चालकांची बैठक घेतली. त्यांच्याकडील सूचना विचारात घेऊन ५१ मुद्दे काढले. त्यातून नवीन नियमावली करून छावणी सुरू करण्याबाबत प्रस्ताव मागविले. आलेल्या प्रस्तावावर विचार करताना संबंधित संस्थांनी दिलेल्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. ज्यांनी पूर्ण कागदपत्रे सादर केली आहेत, अशांना परवानगी देताना इतरांना त्याची माहिती दिली.

ज्यांना चारा छावणी चालविण्याबाबत परवानगी दिली त्यांच्याकडून १० लाखांची बँक गॅरंटी घेतली. संबंधित छावणी चालकांनी चारा कोठून आणला, याबाबत खरेदीचे व्हाऊचर घेतले. त्यामुळे बोगसगिरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला. छावणीचे कामकाज कसे चालते, यासाठी मी स्वत: मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावण्यांना भेट देऊन व्यवस्थेची माहिती घेतल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. 

नवरात्रीनंतर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील चारा छावण्या आपोआप बंद झाल्या. सात महिने जिल्ह्यातील छावण्यांमध्ये एक लाखाच्यावर पशुधन होते. जर छावण्या सुरू केल्या नसत्या तर यातील निम्मे पशुधन शेतकरी निम्या किमतीने बाजारात विकले असते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असते. तसेच आता बºयापैकी पाऊस पडल्यावर, असे पशुधन विकत घेणे त्यांना महागात पडले असते. आहे ते पशुधन जगविणे हे शेतकºयांच्यादृष्टीने फार महत्त्वाचे होते. त्यामुळे छावण्यांवर २०० कोटी खर्च झालेली रक्कम मोठी वाटत असली तरी त्यामुळे जगलेल्या पशुधनाची किमत ७०० कोटींची आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. 

कामाचा व्याप तरीही दिले लक्ष- जिल्ह्यात जानेवारीपासून टंचाई स्थितीकडे लक्ष दिले. मार्चपासून पाणीटंचाई जाणवू लागल्याने टँकरचे नियोजन केले. त्यानंतर चाराटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. अशात लोकसभेची निवडणूक आली. निवडणुकीचे नियोजन करताना चारा छावण्यांवर लक्ष देण्याची जबाबदारी सहकार खात्यावर दिली. त्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामातील टंचाई स्थितीकडे लक्ष दिले. त्यानंतर पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने भीमा, नीरा नदीला पूर आला. पुराच्या नियोजनानंतर विधानसभा निवडणूक लागली. आता निवडणूक संपते न संपते तोच अतिवृष्टीचा प्रश्न समोर आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयdroughtदुष्काळ