सोलापूर : जिल्हयात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. दरम्यान, मंगळवारी पुन्हा ६ नवे रुग्ण आढळले असून, अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथे नव्याने रुग्ण आढळला आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने मंगळवारचा अहवाल जाहीर केला. त्यात प्रयोगशाळेकडून आलेले ६ अहवाल पॉझिटिव्ह तर इतके अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे आहेत. हंजगी, अक्कलकोट : १, घरकुल, कुंभारी : १, भोजप्पा तांडा, उत्तर सोलापूर : १, होटगी (ता. द. सोलापूर) १, लिंबीचिंचोळी (ता. द. सोलापूर) १.
जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आघाडीवर राहिला आहे. सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या कुंभारी येथील विडी घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळू लागल्याने ही आकडेवारी वाढली आहे. त्याखालोखाल बार्शी व अक्कलकोटचा क्रमांक लागत आहे. दररोज रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा आरोग्य विभागाचे टेन्शन वाढत चालले आहे. १३९ रुग्णांपैकी ११ जणांचा मृत्यू तर ६० जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ६८ जण उपचार घेत आहेत.