आॅनलाइन लोकमत सोलापूरमंगळवेढा दि २२ : निंगिरा ओढ्यावर केलेले अतिक्रमण काढून घेण्याबाबत तहसीलदारांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाचे पालन न करता आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ६३ जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, माहितीच्या अधिकाराखाली अतिक्रमणाची बाब उघड झाली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.याबाबत हकीकत अशी की, मंगळवेढा शहरापासून ४ कि.मी अंतरावर असलेल्या जमीन गट नं. १८२८, १९२६, १८०४, १८०६, १८२७, १८०३, १८०५, १९३०, १९२५, १९१६, १९१७, १९१९, १९२०, १९२२, १९२३, १९२४ मधून गेलेल्या निंगिरा ओढ्यावर सिद्धेश्वर कोंडुभैरी, उषाबाई कोंडुभैरी, पद्माकर कोंडुभैरी, मुरलीधर कोंडुभैरी, पंढरीनाथ कोंडुभैरी, झुंबर कोंडुभैरी, युवराज कोंडुभैरी, शिवाजी कोंडुभैरी, नितीन कोंडुभैरी, दत्तात्रय कोंडुभैरी, सुनील कोंडुभैरी, सावित्रा कोंडुभैरी, सदाशिव कोंडुभैरी, ताराबाई कोंडुभैरी, मच्छिंद्र कोंडुभैरी, बंडू कोंडुभैरी, कल्पना जगदाळे, सविता घोंगे, अंबुताई निकम, कविता बागल, कमल कुमठे, अजित शहा, बापूसाहेब शेंबडे, भाऊ शेंबडे, शहाजी शेंबडे, पंढरीनाथ थिटे, शंकर थिटे, नारायण थिटे, वासुदेव थिटे, रामचंद्र वाकडे, शंकर वाकडे, बाळकृष्ण सारडा, नारायण सारडा, गणेश सारडा, नामदेव लेंडवे, सिद्धेश्वर राजमाने, दामू काळे, विलास वाघमोडे, उदय वाघमोडे, उमेश वाघमोडे, अरविंद इंगळे, अक्कुबाई माळी, कृष्णा माळी, श्रीमंत माळी, सुरेश माळी, सुमन माळी, कल्पना माळी, कमल म्हेत्रे, जगन्नाथ माळी, सीताबाई माळी, दशरथ माळी, ज्ञानेश्वर माळी-भिमदे, तुकाराम माळी, मुक्ताबाई वाघ, औदुंबर वाघ, दिगंबर वाघ, महादेव वाघ, श्रीदेव सातपुते, राधेशाम सारडा, धोंडिराम गायकवाड, अंकुश गायकवाड, संतोष गायकवाड, बापूसाहेब गायकवाड (सर्व रा. मंगळवेढा) आदींनी अतिक्रमण केले होते.तत्कालीन तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या न्यायालयाने अतिक्रमण काढण्याबाबत आदेश पारित केले होते; मात्र आदेशाचे उल्लंघन केल्याने मंगळवेढ्याचे मंडल अधिकारी रणजितकुमार मोरे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर वरील सर्वांविरुद्ध भा. दं. वि. सं. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सुधीर माने करीत आहेत.
मंगळवेढा येथील निंगिरा ओढ्यावर अतिक्रमण करणाºया ६३ जणांवर गुन्हा दाखल, तहसिलदारांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:42 AM
निंगिरा ओढ्यावर केलेले अतिक्रमण काढून घेण्याबाबत तहसीलदारांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाचे पालन न करता आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ६३ जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देमाहितीच्या अधिकाराखाली अतिक्रमणाची बाब उघड झाली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.अतिक्रमण काढून घेण्याबाबत तहसीलदारांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाचे पालन न करता आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ६३ जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल