सोलापूर : चातुर्मास संपल्यानंतर पुढील महिन्यात नोव्हेंबरच्या २० तारखेपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात होत असून, यंदा धूमधडाक्यात लग्नाचे बार उडणार आहेत. तुळशी विवाहानंतर इच्छुक वधू-वरांच्या लगीनघाईला सुरुवात होणार आहे. नऊ जुलै २०२२ पर्यंत लग्नाचे बार उडणार आहेत. नऊ जुलै २०२२ पर्यंत लग्नाचे यंदा तब्बल ६३ मुहूर्त आहेत. नोव्हेंबरमध्ये चार, डिसेंबरमध्ये ११, जानेवारीत पाच, फेब्रुवारीत सहा, मार्चमध्ये चार, एप्रिलमध्ये सहा, मेमध्ये ११, जूनमध्ये १० व जुलैमध्ये सहा विवाह मुहूर्त आहेत.
----
यंदाचे लग्नाचे मुहूर्त
- नोव्हेंबर : २०, २१, २९, ३०
- डिसेंबर : १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९
- २०२२
- जानेवारी : २०, २२, २३, २७, २९
- फेब्रुवारी : ५, ६, ७, १०, १७, १९
- मार्च : २५, २६, २७, २८
- एप्रिल : १५, १७, १९, २१, २४, २५
- मे : ४, १०,१३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७
- जून : १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२
- जुलै : ३, ५, ६, ७, ८, ९
मार्चमध्ये कमी मुहूर्त
मार्चमध्ये गुरूच्या अस्तामुळे मार्च महिन्यामध्ये केवळ चार लग्नाचे मुहूर्त आहेत. २५, २६, २७, २८ सर्वात कमी चार मुहूर्त आहेत तर सर्वाधिक डिसेंबर व मेमध्ये ११ आहेत.
मंगल कार्यालयात विचारपूस
यंदा दिवाळीनंतर म्हणजेच २० नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरुवात होणार आहे. नागरिक कोरोना नियम आणि किती नागरिकांना लग्नात परवानगी मिळणार आहे याबाबत विचारणा केली जात आहे. काही प्रमाणात डिसेंबर, एप्रिल, मे मधील बुकिंग करण्याकडे ५ टक्के नागरिकांचा कल दिसून येत आहे.
सध्या मंगल कार्यालये, केटरर्स, डेकोरेशन, बुकिंग सध्या सुरू नाही, मात्र नागरिक विचारपूस करून जात आहेत. यंदा कार्यालयाच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी मिळावी आणि नियम व अटीमध्ये सूट मिळावी.
-वीरेंद्र हिंगमिरे, अध्यक्ष मंगल भांडार वेल्फेअर असोसिएशन, सोलापूर
गेल्यावर्षी गुरू, शुक्राचा अस्त असल्यामुळे चार महिने मुहूर्त नव्हते. यावर्षी केवळ मार्चमध्ये गुरूचा अस्त असल्याने कमी मुहूर्त आहेत. मात्र बाकी सर्वच महिन्यात अधिक मुहूर्त असल्यामुळे यंदा लग्नसराई धूमधडाक्यात होतील असा अंदाज आहे. यावर्षी ९ जुलैपर्यंत लग्नाचे ६३ मुहूर्त आहेत.
-मोहन दाते, ज्योतिषाचार्य
----