सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असून योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार ८७७ शेतकऱ्यांना ६४८ कोटी ९८ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. एकूण ८४ हजार लाभार्थी पैकी तीन हजार शेतकरी हे करदाते असल्यामुळे त्यांना या योजनेतून वगळले. उर्वरित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार विभागाने नोव्हेंबरमध्ये विशेष मोहीम राबवली होती. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्य सरकारकडून सोलापूर सहकार विभागाचे कौतुक झाले.
ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी होते. तक्रारी प्रलंबित होत्या. त्यांच्यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घेण्यासाठी व तक्रार निराकरणासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत सहकार विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविली. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच या विशेष मोहीम कालावधीत आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक होते. तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करणे अपेक्षित होते. परंतु तालुका पातळीवर संबंधित अपात्र किंवा त्रुटी राहिलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा सहकार विभाग माणुसकीच्यादृष्टीने सहकार्य करत आहे.
- एकूण लाभार्थी- ८४ हजार
- अपात्र -३ हजार
सहकार विभागाने दाखविली माणुसकी...
या योजनेतील लाभार्थी किंवा अपात्र शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा तक्रारी सोडवण्यासाठी सहकार विभागाने १५ नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम राबविली. या दरम्यान काही शेतकऱ्यांनी तक्रारी मांडून योजनेतील अडचणी सांगितल्या. काही शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबर नंतर सहकार विभागाशी संपर्क साधला. सहकार विभागाने माणुसकीच्या दृष्टीने संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अजूनही काही शेतकरी सहकार विभागाकडे योजनेचे लाभ मिळविण्यासाठी येतात. त्यांनाही सहकार विभाग सहकार्य करत आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेशी संपर्क साधून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देत आहेत.
........