आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मागील दहा दिवसांपासून सोलापूर शहरासोबतच उजनी धरण परिसरात पावसाने चांगलीच दडी मारली आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होतानाचे चित्र दिसून येत नाही.
सध्या उजनीमध्ये ७०.७४ टक्के पाणीसाठा असल्याचे उजनी कालवा महामंडळाने सांगितले. दरम्यान, उजनीच्या कार्यक्षेत्रात फारसा पाऊस पडत नाही. गेली १० दिवस अशी स्थिती असून उजनीची पाणी पातळी १३.२२ टक्केवर स्थिर झाली आहे. आज सकाळच्या माहितीनुसार उजनीमध्ये ७०.७४ टीएमसी पाणीसाठा आहे. यातील ७.०८ टक्के हा उपयुक्त साठा आहे. उजनीकडे येणारा दौण्ड विसर्ग सध्या ६७६ क्युसेक इतका आहे. उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. येत्या पंधरा दिवसात चांगला पाऊस न पडल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळपासून हवामानात बदल झाला असून रात्री पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.