पोलीस नाईक बनसोडे, कॉन्स्टेबल दत्तात्रय काटे, होमगार्ड लांब हे २७ मे रोजी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना हबिसेवाडी येथील मरिआई मंदिराच्या सभामंडपात काही इसम पैशावर पैज लावून पत्त्याचा जुगार खेळत असल्याची बातमी मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता संतोष गणपत वगरे, भारत काकासाहेब म्हारनूर, विलास सदाशिव उत्तरे, पांडुरंग सदाशिव उत्तरे, आगतराव दादासाहेब म्हारनूर (रा. हबिसेवाडी), रामचंद्र बाबू आवताडे (रा. नराळे, ता. सांगोला), दत्तात्रय सदाशिव यादव (रा. वायफळ, ता.जत) हे गोल रिंगण करून रम्मी नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले.
पोलिसांनी या कारवाईत एमएम ११/एक्स११८५, एमएम १० /बीटी ८०५७, एमएम ०२ /जीए ९२०६, एमएम ४५ /एएच ८४९७ या ७० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकींसह रोख १२६० रुपये व जुगार साहित्य, असा ७१ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय काटे यांनी सात जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.