-सोनाली सरवदे, सरपंच, जामगाव, ता. माढा
-----
मागील वर्षी कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून मुंबई, पुणे, बेंगलोर, सोलापूर येथील स्थलांतरित लोकांना गावाकडे येण्यापासून रोखले. एकत्रित घोळका होऊन बसण्यास मनाई केली. लग्नकार्य, अंत्यविधीला गर्दी करू नये अशा सूचना केल्या. सार्वजनिक पाणीपुरवठा वेळच्यावेळी स्वच्छ करणे अशा अनेक बाबीचे पालन तंतोतंत करण्यात आले. यामुळे आजही गावातील एकाही व्यक्तीला कोरोना झालेले नाही. यासाठी संपूर्ण ग्रामस्थांचं योगदान आहे.
- रोहिणी फुलारी, रामपूर, ता. अक्कलकोट
----
आमचे गाव खूप लहान आहे लोकसंख्या कमी आहे त्यात शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या ८० टक्केपेक्षा अधिक आहे, त्यामुळे बाहेर येणे जाणे कमी असते. अन्य गावाहून येणाऱ्या व्यक्तींशी तपासणी करूनच गावात प्रवेश दिला जातो. ग्रामस्थांना मोफत सॅनिटायझरचे आणि मास्कचे वाटप केले. घरातून बाहेर पडताना मास्क वापरणं सक्तीचं केले आहे. ग्रामस्थांना विशेषतः तरुणांना गर्दी करून एकत्र बसण्यास प्रतिबंध आहे. याकामी शिक्षित लोकांची आम्ही मदत घेतली. आशा वर्कर नियमितपणे गावात फिरून ग्रामस्थांची चौकशी करतात. गरजेनुसार त्यांना औषध पुरवठा आणि - शाहिनबी शेख,सरपंच, गंगेवाडी, ता. दक्षिण सोलापूर
----