सोलापूर : भारतीय रेल्वेकडून आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देण्यात आलीय. कोरोना संक्रमणकाळात रेल्वेला मोठा फटका बसला असला तरीदेखील रेल्वेकडून आपल्या ११ लाख ५६ हजार 'नॉन - गॅझेटेड' कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.
या कर्मचाऱ्यांना २०२१-२२ साठी जवळपास ७८ दिवसाचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वेच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. नुकत्याच झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं रेल्वे मंत्रालयाच्या सर्व पात्र नसलेल्या 'नॉन गॅझेटेड' कर्मचार्यांना हा बोनस मिळणार आहे. या बोनसची रक्कम दसरा सणापूर्वी त्यांच्या त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.