सोलापूर : शहरात बिल्डिंग मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो, तुमचा माल पसंद पडला आहे, गोडावूनला माल पाठवून द्या, पैसे आरटीजीएस करतो, असे सांगून शहरातील आठ व्यापाºयांना १९ लाख १0 हजार ४३३ रूपयांना फसविल्याप्रकरणी दोघांविरूद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश जैन (संपूर्ण नाव, पत्ता नाही), केतन सूर्यकांत बनसोेडे (रा. १२२, ओम नम शिवायनगर, हत्तुरे वस्ती, होटगी रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अभिषेक श्रीनिवास सोनी (वय-२५, रा. ८५, भवानी पेठ, घोंगडे वस्ती) यांचे क्युक फॅब मेटल्स प्रा. लि. नावाची कंपनी असून, त्यांचे बंधू जयकिशन सोनी यांना २२ आॅक्टोबर २0१८ रोजी फोन आला. फोनवरील व्यक्तीने मी रमेश जैन बोलतो, असे सांगून शहरात बिल्डिंग मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो, आपणाकडे नवीन पत्रे योग्य भावात मिळतात, अशी माहिती मिळाली़ पत्र्याचे सॅम्पल दाखवता का.? असे विचारले.
जयकिसन सोनी यांनी ३१ आॅक्टोबर २0१८ रोजी रमेश जैन यांना संपर्क साधून हरे कृष्ण विहार रोड जुळे सोलापूर येथील बाफना इंटरप्रायजेस येथे जाऊन पत्र्याचे सॅम्पल दाखविले. थोड्याच वेळात जयकिसन सोनी यांना फोनवरून रमेश जैन याने सिमेंटच्या पत्र्याची आॅर्डर दिली. ८ नोव्हेंबर २0१८ रोजी रमेश जैन याला ३ लाख २८ हजार ५0 रूपये किमतीचे पत्रे पाठवण्यात आले. रमेश जैन याने अॅक्सिस बँक, शाखा विजापूर रोडचे दोन धनादेश दिले. दोन्ही धनादेश २२ व २३ नोव्हेंबर २0१८ चे होते. १३ नोव्हेंबर २0१८ रोजी पुन्हा जयकिसन सोनी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप करून पत्र्याची आॅर्डर दिली व रक्कम आरटीजीएसने पाठवून देतो, असे सांगितले. जयकिसन सोनी यांनी २ लाख ४ हजार १२0 रूपये किमतीचे पत्रे पाठवून दिले.
रमेश जैन याला जयकिसन सोनी यांनी १६ नोव्हेंबर रोजी बिलासाठी फोन केला असता ७७९६४0३४0५ व ८६0५0३0७२८ हे दोन्ही मोबाईल बंद असल्याचे समजले. २0 नोव्हेंबर रोजी जयकिसन सोनी यांनी रमेश जैन याच्या आॅफिस व गोडावूनला भेट दिली असता दोन्ही बंद असल्याचे निदर्शनास आले. जयकिसन सोनी यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्याने शहरातील अन्य आठ व्यापाºयांकडून अशाच पद्धतीने वेगवेगळा माल घेऊन पैसे दिले नसल्याचे लक्षात आले.
फसलेले आठ जणच्रमेश जैन याने मोईन म. रफिक शेख यांच्याकडून ८९ हजार ४२0 रूपये किमतीचे पीव्हीसी कारपेट, उमर एजाज दलाल यांच्याकडून ९३ हजार ८३४ रूपये किमतीचे प्लायवूड व सन्माईक, केतन महिंद्र शहा यांच्याकडून १ लाख २३ हजार ९९0 रूपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सुरेश चंद्रशेखर स्वामी यांच्याकडून १ लाख ७७ हजार ५४९ रूपये किमतीचे नळ साहित्य, नवराम चौधरी यांच्याकडून २ लाख ४४ हजार रूपये किमतीचे लाईट हाऊसचे सामान, अरूण बाहुबली गांधी यांच्याकडून ३ लाख २९ हजार ८00 रूपये किमतीचे फर्निचर, रमेशभाई चौधरी यांच्याकडून ८२ हजारांचे किचन ट्रॉली सामान आणि वैभव वल्लभ प्रभू यांच्याकडून २ लाख ३७ हजार ६७0 रूपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन पैसे न देता फसवणूक केली.