ठळक मुद्देपाच दिवसांसाठी अक्कलकोट रोड-नागणसूरदरम्यान इंटरलॉकिंगचे कामसोलापूर-वाडीदरम्यान रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू८ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला
सोलापूर : सोलापूर विभागात सोलापूर-वाडीदरम्यान रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे़ या अंतर्गत पाच दिवसांसाठी अक्कलकोट रोड-नागणसूरदरम्यान इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे़
परिणामत: पाच दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ८ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे़ याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आऱ के़ शर्मा यांनी दिली़ २५ ते २९ मे असे पाच दिवस रेल्वे वाहतूक थांबणार आहे़ अक्कलकोट रोड-नागणसूर रेल्वे स्टेशनमध्ये १५ किलोमीटरपर्यंतचे काम हाती घेण्यात आले आहे़
लोकमान्य टिळक-विशाखापट्टणम (१८५२०) एक्स्प्रेस ही २६ आणि २७ असे दोन दिवस सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़
मार्ग बदलून जाणाºया गाड्या
- - विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस (१८५१९) ही २६ आणि २७ मे रोजी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़
- - भुवनेश्वर-मुंबई एक्स्प्रेस(११०२०) २६ आणि २७ मे रोजी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड- कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़
- - हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस ही २६ मे रोजी एक दिवस सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़
- - सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस(१७०१८) ही २६ मे रोजी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़
- - मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेस (११०१९) ही २७ मे रोजी कुर्डूवाडी-लातूर-विकाराबाद-सिकंदराबादमार्गे धावणार आहे़
- - मुंबई-बेंगलोर उद्यान एक्स्प्रेस (११३०१) ही २६ आणि २७ मे रोजी होटगी-गदग-बेल्लारी-गुंटकलमार्गे धावणार आहे़
- - चेन्नई-मुंबई मेल एक्स्प्रेस (११०२८) ही २६ आणि २७ मे रोजी होटगी, गदग, बेल्लारी, गुंटकलमार्गे धावणार आहे़