२०२०-२१ या आर्थिक वर्षांतील कार्यक्रमांतर्गत माढा तालुक्यातील अकोले (खु.) महाडिक वस्ती, हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे- ६ लाख, बावी येथील विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे- ८ लाख, चांदज येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे- ९ लाख, टेंभुर्णी येथे कसबा पेठ श्रीराम मंदिरासमोर सभामंडप बांधणे- ८ लाख, टेंभुर्णी येथे लोंढे वस्ती, विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, संत गाडगेबाबा मंदिर येथे ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे- ७ लाख, आलेगाव (खु.) येथे पुनर्वसन गावठाण मंदिरासमोर सभामंडप बांधणे- ७ लाख, शेवरे येथील तुळजाभवानी मंदिरासमोर ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे- ६ लाख, आलेगाव (बु.) येथील लक्ष्मीआई मंदिर (दलित वस्ती) ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे- ७ लाख, शिराळ (मा.) येथे दलित वस्तीत ग्रा.पं. जागेत सामाजिक सभागृह बांधणे- ७ लाख, तसेच पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी येथे ग्रा.पं. जागेत व्यायामशाळा बांधणे- ७ लाख ९९ हजार रुपये, तसेच माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे व्यायामशाळेस व्यायाम साहित्य देणे- रक्कम २ लाख, देण्यासाठी एकत्रिक मिळून ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. शिंदे यांनी सांगितले.
---