माढा : आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून माढा मतदार संघातील विकासकामांसाठी ८० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
माढा मतदारसंघात सामाविष्ट झालेल्या माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ही कामे होत आहेत. व्यायामशाळा, व्यायामशाळा साहित्य, सभामंडप व सामाजिक सभागृह यासाठी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
तालुक्यातील अकोले (खु), महाडीक वस्ती, हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी सात लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे. बावी येथील विठ्ठल मंदिरासमोर सभामंडपासाठी ८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. चांदज येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी नऊ लाख तर टेंभुर्णी येथे कसबा पेठेत श्रीराम मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी ९ लाखांची तरतूद झाली आहे. लोंढे वस्तीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत गाडगेबाबा मंदिर येथे ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधण्यासाठी सात लाखांची तरतूद झाली आहे. आलेगांव (खु.) येथे पुनर्वसन गावठाण मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी सात लाख तर शेवरे येथील तुळजाभवानी मंदिरासमोर ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधण्यासाठी सात लाख रुपये तरतूद झाले आहेत. आलेगांव (बु.) येथील लक्ष्मीआई मंदिर (दलित वस्ती) ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधण्यासाठी सात लाख रुपये तरतूद झाले आहेत. शिराळ (मा) येथे दलित वस्तीत ग्रामपंचायतीच्या जागेत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी सात लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायामशाळा बांधण्यासाठी सात लाख ९९ हजार रुपयांची तर माळशिरस तालुक्यातील वाफेगांव येथे व्यायामशाळेस व्यायामसाहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दोन लाखांची तरतूद करण्यात आली आहे.