पंढरपूर ते कुरुल या ३६ किलोमीटर रस्त्यासाठी शुक्रवारी टाकळी सिकंदर चौकात भारतीय जनता पार्टी, मोहोळ व पंढरपूर यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सभापती विजयराज डोंगरे, मार्केट कमिटीचे सभापती दिलीप घाडगे, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, पंढरपूरचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, युवक नेते प्रणव परिचारक, सुभाष मस्के, सुभाष माने, शंकरराव वाघमारे, राजूबापू गावडे, सुशील क्षीरसागर, माऊली हळणवर, प्रशांत देशमुख, दीपक गवळी, मोहन होनमाने, पांडुरंग बचुटे, बाबासाहेब जाधव, दीपक पुजारी, प्रशांत पाटील, सुनील जाधव, मुजीब मुजावर, विलास पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या निधीतून तीर्थक्षेत्र पंढरपूरला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे तीन हजार कोटींतून झाली आहेत. मात्र, याच रस्त्याचे काम का रखडले आहे. लवकर काम सुरू न झाल्यास महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी विजयराज डोंगरे म्हणाले, पंढरपूर कुरुल हा राज्यमार्ग असल्याने याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे.या सरकारच्या भरोसावर राहण्यापेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करुन काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गावडे यांनी निवेदन स्वीकारले.
...............
फोटो ओळी : कुरुल - पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केल्यानंतर बांधकाम विभागाचे अभियंता गावडे यांना निवेदन देताना अमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, श्रीकांत देशमुख, विजयराज डोंगरे आदी.
.........
(फोटो २४कुरुल भाजपा)