करमाळा : शासनाची प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजना आणली आहे. या योजनेतून शासन अनेक कुटुंबांना स्थिर करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. करमाळ्यात ३१७ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच यंदा ८१ जणांनी घरकुलासाठी नोंद केली असून, त्यांची यादी नगरपालिकेला प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिली.
शासनाच्या सामान्य नागरिकांच्या हिताच्या विविध योजना तळा-गळातल्या गोरगरीब जनतेसाठीच आहेत. त्या जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सामान्य नागरिक हा शहर विकासाचा केंद्रबिंदू मानला गेला आहे. अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांपर्यंतचा लाभ शहरातील जनतेला झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची पार्श्वभूमीवर निधी वाटपासंदर्भात शासनावर मर्यादा आल्या आहेत. या अडचणीच्या काळात विविध योजनांसाठी शासन दरबारी मागणी करून निधी खेचून आणल्याचे जगताप यांनी सांगितले.