सोमवारी सांगोला शहर व तालुक्यातील ६७२ जणांची कोरोना चाचणीत ८१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५९१ जण निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत सांगोला ग्रामीण रुग्णालयात १७,७०६ तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४८,७८८ अशा ६६ हजार ४९४ जणांच्या घेण्यात आल्या. कोरोना चाचणीत ४ ७४९ जण पॉझिटिव्ह तर ६१,७८५ जण निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३ हजार ६९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून उपचारादरम्यान ७० जणांचा मृत्यू झाला आहे. अत्यवस्थ असलेल्या ९५ रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
१५ हजार ५१ जणांना लसीकरण
सांगोल्यात सोमवारी ११०७ नागरिकांना लसीकरण केले. तर आतापर्यंत तालुक्यातील १५ हजार ५१ नागरिकांचे लसीकरण केले आहे. दोन दिवस लस उपलब्ध नसल्याने लसीकरण झाले नाही. त्यामुळे सोमवारी लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.